विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना प्रतिबंध आवश्यक’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय प्रबोधिनी अधिवक्ता सुशील अत्रे म्हणाले कि, ‘लव्ह जिहाद’ हे एकप्रकारचे युद्ध आहे आणि हिंदूंना ते लढावेच लागेल. या युद्धात कायद्याचा प्रभावी वापर करू शकतो. लव्ह जिहादमध्ये ज्या तरुणी, महिला अडकतात त्यांच्यावर होणार्या अत्याचारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भारतीय दंडविधान कलम ३६६, ३६६ ए, तसेच ४१८ या कलमाचा वापर करता येऊ शकतो. याशिवाय मुलगी अल्पवयीन असल्यास ‘पोक्सो अॅक्ट’ अंतर्गतही गुन्हा दाखल करता येतो. पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करून घ्यायला नकार दिल्यास भारतीय दंडविधान १५४ अंतर्गत संबंधित पोलिसांच्या वरिष्ठांकडे आपण तक्रार करू शकतो.