विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना प्रतिबंध आवश्यक’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना बंगाल येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ . कौशिकचंद्र मल्लिक म्हणाले, भारत स्वतंत्र झाल्यावर इंग्रज देश सोडून गेले; मात्र मिशनरी शाळांच्या माध्यमातून आजही इंग्रजांचा भारतियांवर प्रभाव आहे. मिशनर्यांकडून चालवण्यात येणार्या शाळांमध्ये उच्चवर्गातील मुले जातात, जी पुढे जाऊन हिंदु संस्कृतीविरोधी विचारधारा असलेले बनतात. कोणतीही आपत्ती आल्यास साहाय्य करण्याच्या नावाखाली ख्रिस्ती संघटना तेथे तात्काळ पोहोचतात आणि त्याचा वापर संकटात असलेल्यांचे धर्मांतर करण्यासाठी करून घेतात. पूर्वोत्तर राज्यांतही आज ख्रिस्त्यांकडून होणार्या धर्मांतराची समस्या गंभीर आहे. म्हणूनच हे राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ झाले तरच हिंदू वाचू शकतील.