विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना प्रतिबंध आवश्यक’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश गाडे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे’, असे सांगितले आहे. त्यामुळे धर्मांतरितांचे शुद्धीकरण करण्यावरीही भर द्यायला हवा. हिंदूंच्या अनेक धर्मग्रंथांत धर्मांतरित झालेल्यांना स्वधर्मात घेण्याविषयी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. अर्थववेद, देवल स्मृती हे काही त्यातील ठळक ग्रंथ आहेत. गोवा राज्यात प.पू. भाऊ मसुरकर यांनीही धर्मांतरितांचे शुद्धीकरण मोठ्या प्रमाणात केले होते. सनातन संस्थेनेही वर्ष २०१४ पासून शुद्धीकरणाचे अभियान हातात घेतले असून परधर्मांत गेलेल्यांचे शुद्धीकरण आणि जे परधर्मिय हिंदु धर्मांत येऊ इच्छितात त्यांचेही शुद्धीकरण, असे दोन्ही प्रकारे कार्य चालू आहे.
धर्मांतरितांचे शुद्धीकरण करण्यावरही भर देणे आवश्यक ! – श्री. नागेश गाडे, हिंदु जनजागृती समिती
Tags : Hindu AdhiveshanHindu Janajagruti SamitiReligious ConversionsSanatan-Sansthaहिंदूंच्या समस्या