विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : ‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ या उद्बोधन सत्रामध्ये ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू, ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राहुल कौल, श्री. राहुल राजदान आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी श्री. राजदान यांनी काश्मिरी वेश परिधान केला होता. त्यासमवेतच ‘दूध मांगोगे, तो खीर देंगे, काश्मीर मांगोगे तो चीर देंगे’, ‘हर हिंदू का नारा है, काश्मीर हमारा है’, यांसारख्या घोषणांनी वातावरण काश्मीरप्रतीच्या प्रेमामुळे भारून गेले.
‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ या उद्बोधन सत्रामध्ये वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन
‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ या उद्बोधन सत्राच्या शेवटी पारित करण्यात आलेले ठराव !
१. केंद्रशासनाने ‘काश्मीरचे भारतातील विलीनीकरण कोणत्याही परिस्थितीत करणारच’, असे घोषित करावे.
२. काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाला ‘वंशविच्छेद’, तर काश्मिरी हिंदूंना ‘देशांतर्गत विस्थापित’ म्हणून घोषित करा.
३. काश्मिरी हिंदूंच्या ‘वंशविच्छेदा’विषयी हिंदूंना जलद न्याय मिळण्यासाठी न्यायालयीन प्रावधान करा.