विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : देशभरातील हिंदुत्वनिष्ठांनी मंदिर सरकारीकरणाला विरोध करून त्यांचे पावित्र्य जपले जाण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करावे, असा निर्धार अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला. निमित्त होते १५ जून या दिवशी ‘मंदिर सरकारीकरणाला विरोध आणि मंदिरांच्या पावित्र्याचे रक्षण’ या विषयावर आयोजित उद्बोधन सत्राचे ! या सत्रात सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता श्री. साई दीपक, लखनौ येथील ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टिस’ या संस्थेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. हरि शंकर जैन, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, बंगालमधील हिंदुत्वनिष्ठ श्री. बिकर्ण नासकर, ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर, अधिवक्ता अर्चना जी., तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी हिंदुत्वनिष्ठांना संबोधित केले.
स्वभाषा आणि स्वसंस्कृती यांचे रक्षण करणे आवश्यक ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती
स्वधर्म, स्वभाषा आणि स्वराष्ट्र यांचे रक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परकीय भाषा स्वीकारल्याने आपण दास्यत्व स्वीकारतो आणि तशी मानसिक दास्यता सध्या अधिक आहे. त्यामुळे स्वभाषा शिकून स्वसंस्कृती यांचे रक्षण करणे आवश्यक आहे.
मंदिर सरकारीकरणाला विरोध आणि मंदिरांच्या पावित्र्याचे रक्षण’ या विषयावर अन्य वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन
२. अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करणार ! – अधिवक्ता श्री. हरि शंकर जैन, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस
४. पुरातत्व विभागाची आतापर्यंतची भूमिका हिंदुद्रोही ! – श्री. अनिल धीर, भारत रक्षा मंच
उद्बोधन सत्रात संमत केलेले ठराव
१. हिंदूंची मोक्षभूमी काशी आणि भगवान श्रीकृष्णाची नगरी मथुरा येथे अतिक्रमण केलेल्या मशिदी तात्काळ हटवून ती जागा हिंदूंच्या स्वाधीन करण्यात यावी.
२. धार्मिक स्थळ कायदा (विशेष प्रावधान) तात्काळ हटवण्यात यावा.
३. मंदिरे शासकीय नियंत्रित करण्याविषयीचे सर्व कायदे तात्काळ रहित करण्यात यावेत.
४. भक्तांना धर्मशिक्षण मिळण्याच्या हेतूने सर्व मंदिरांच्या पुजार्यांना धर्मशिक्षण देण्याची विशेष योजना चालू करावी.