विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : ‘मंदिरांच्या माध्यमातून हिंदूसंघटन’ याविषयी बंगालमध्ये केलेल्या प्रयत्नांचे अनुभवकथन सांगतांना श्री. नासकर यांनी सांगितले की . . .
१. देशभरातील कोणत्याही राज्यात हिंदूंवर अत्याचार वा अन्याय झाल्यास अन्य राज्यांतील हिंदू शांत बसतात.
२. शिक्षणामध्ये संस्कार आणि हिंदुत्व नसून निधर्मीवादच शिकवला जातो. बुद्धीजीवी वर्ग हा धर्मनिरपेक्षतावादी झाला आहे.
३. बंगालमध्ये प्रतिदिन १०० हून अधिक हिंदूूंवर अन्याय केला जात आहे; परंतु त्याची बातमी कोणतीच प्रसिद्धीमाध्यमे दाखवत नाहीत.
४. तेथील एका सरकारीकरण झालेल्या देवीच्या मंदिराचा कारभार हा मुसलमान अधिकारी व्यक्ती बघणार आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे आणि त्यांनी दिलेले आदेश हिंदूंना ऐकावेच लागेल. बंगालमधील तारापीठ येथील देवीच्या मंदिराचे सरकारीकरण करण्यात आल्यानंतर शासनाने दान म्हणून जमा होणारा निधी समाजाला धर्मशिक्षण देण्यासाठी व्यय केलेला नाही.
५. बंगालमधील २१ मंदिरांमध्ये पहाटे नामजप लावला जातो, तसेच त्या मंदिराच्या माध्यमातून हिंदूंना प्रतिमास धर्मशिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये त्या मासामध्ये येणारी एकादशी, सण, उत्सव यांविषयी अवगत करून देण्यात येते.