विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : ‘अयोध्येत राममंदिर बनवण्यामध्ये येणार्या समस्या आणि हिंदुत्वनिष्ठांचे कर्तव्य’ या विषयावर बोलतांना अधिवक्ता श्री. हरि शंकर जैन म्हणाले की, अयोध्येत राममंदिर बांधणे, हा हिंदू आणि राष्ट्र या दोन्हींविषयी अस्मितेचा विषय आहे. अयोध्येत राममंदिर होते, याविषयीचे अनेक पुरावे विविध स्तरातील न्यायालयांमध्ये देण्यात आले आणि त्यांनीही त्याविषयीचा निकाल दिला आहे. सध्या राममंदिराचा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. एकूण या प्रकरणात हिंदू हे राममंदिराच्या जागेवरील हक्क सोडणार नाहीत आणि एक इंचही जागा मशिदीसाठी देणार नाहीत. असे प्रतिपादन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे अधिवक्ता श्री. हरि शंकर जैन यांनी केले. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १५ जून या दिवशी झालेल्या ‘‘मंदिर सरकारीकरणाला विरोध आणि मंदिरांच्या पावित्र्याचे रक्षण’ या विषयावरील उद्बोधन सत्रात ते बोलत होते.
श्री. हरि शंकर जैन म्हणाले, येत्या ६ डिसेंबर २०१७ या दिवशी सर्व हिंदुत्वनिष्ठ बैठक घेऊन राममंदिर निर्मितीचा दिनांक घोषित करून त्या दिशेने मार्गक्रमण करतील. आम्ही अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत हिंदू ‘मंदिर वही बनायेंगे’ अशी घोषणा देत होते. आता येथून पुढे ‘रामलल्ला हम आ रहे है । मंदिर वही बनाने जा रहे है ।’, अशी घोषणा देतील.