रामनाथी, गोवा – तेलंगणमधील तेलंगण राष्ट्र समितीप्रणित शासन, तसेच सर्व राजकीय पक्ष यांच्याकडून अल्पसंख्यांकांचे सर्वाधिक तुष्टीकरण केले जात आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगण येथे अल्पसंख्यांकांच्या भरवशावर शासन स्थापन केले जाते. त्यामुळेच तेथे सर्व पक्ष इफ्तार मेजवान्यांचे आयोजन करतात. त्यामध्ये राजकीय नेत्यांसमवेत प्रशासकीय अधिकारीही सहभागी होतात; पण तेच नेते आणि अधिकारी गणेशोत्सवाच्या काळात गणेश पूजनासाठी बोलवूनही येत नाहीत. तेलंगणमध्ये पूर्वी १ सहस्र तलाव होते. आता तेथे केवळ १२ तलावच आहेत. त्या ठिकाणी देवतांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यास मज्जाव केला जातो; कारण त्या भागात अल्पसंख्यांकांनी मशिदी उभारल्या आहेत. तेलंगण राष्ट्र समितीचे शासन हे अल्पसंख्यांकाच्या तुष्टीकरणासाठी बहुसंख्यांकांचे आरक्षण आणि सुविधा देण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. त्या भागात चर्च आणि मशीद बनवण्यासाठी तहसील कार्यालयातून तात्काळ अनुमती दिली जाते.