रामनाथी, गोवा – भारताला रामराज्य, सम्राट युधिष्ठिर यांचे धर्मराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य, या आदर्श राजकीय व्यवस्थांची परंपरा आहे; मात्र सध्या राज्यव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, पोलीस आणि अन्य सर्वच व्यवस्थांमध्ये भ्रष्टाचार वाढत आहे. कार्य आणि व्यवसाय करत असतांना या दृष्पप्रवत्तींमुळे अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. सर्वसामान्य व्यक्तीही अधर्माचरण, निधर्मीवाद यांमुळे त्या व्यवस्थेचा एक घटक बनत चालला आहे. हे राष्ट्र माझे आहे, ही माझी मातृभूमी आहे आणि या समाजाचा मी एक घटक आहे, या दृष्टीने सामाजिक कर्तव्य म्हणून या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात उभे राहून वैध मार्गाने संघर्ष करायला हवा.