पुणे : ‘अायएसअायएस’(इसिस) या दहशतवादी संघटनेकडे अाकर्षित हाेत असलेल्या पुण्यातील अकरावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीचे मतपरिवर्तन करण्यात ‘एटीएस’ला यश अाले अाहे. धक्कादायक बाब म्हणजे ही मुलगी इसिसकडे ‘सुसाइड बाॅम्बर’ म्हणून जाणार हाेती. पुणे एटीएस पथकाचे सहायक पोलिस अायुक्त भानुप्रताप बर्गे यांनी या माहितीस दुजाेरा िदला.
राजस्थानातील जयपूर येथे काही दिवसांपूर्वी ‘इसिस’च्या संपर्कातील अभियंता तरुणास अटक करण्यात अाली हाेती. त्याच्या चाैकशीत पुण्यातील मुलगीही इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसचे अतिरिक्त पाेलिस महासंचालक विवेक फणसळकर, विशेष महानिर्देशक निकेत काैशिक यांना िमळाली हाेती. त्याअाधारे या अधिकाऱ्यांनी पुण्यात तपासचक्रे िफरवत मुलीला शाेधून काढले.
पुण्यातील एका नामांकित काॅलेजात ती अकरावीत शिकते
चार महिन्यांपासून ती इंटरनेटद्वारे श्रीलंकेतील इसिस एजंटच्या संपर्कात हाेती. तिला इसिसच्या फेसबुक पेज, ट्विटर, टेलिग्राफ ग्रुपमध्ये घेण्यात अाले हाेते. श्रीलंका, िफलिपाइन्स, इंग्लंड, साैदी अरेबिया, दुबई, केनिया, युरोपियन देशांसह भारतातील तामिळनाडू, अांध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटक राज्यातील २०० तरुण-तरुणींच्या ग्रुपमध्येही तिला घेण्यात आले होते. या गटाद्वारे माथे भडकावून या मुलीला हिंसक कारवाया करण्यासाठी तयार करण्यात अाले. ‘सुसाइड बाॅम्बर’ हाेण्याची तिची तयारी हाेती.
जीन्स, मिनी स्कर्ट सोडून तरुणी बुरख्यात..
उच्चशिक्षित कुटुंबातील या हुशार मुलीला दहावीत ९० टक्के गुण होते. सुरुवातीला जीन्स, मिनी स्कर्ट असे स्टायलिश कपडे ती वापरत हाेती. मात्र, इसिसच्या संपर्कात अाल्यापासून हा अाधुनिक पेहराव साेडून तिने बुरखा घालणे सुरू केले. धार्मिक कट्टरता वाढू लागल्याने तिचे आई- वडिलांशी मागील काळात खटके उडू लागले हाेते. इसिसच्या सदस्यांशी ती फाेनवर न बाेलता केवळ साेशल मिडियाच्या माध्यमातून संपर्कात हाेती. इसिसने तिला वैद्यकीय शिक्षणासाठी सिरियात बोलावले होते. तपासादरम्यान या बाबी िनष्पन्न झाल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.
संदर्भ : दिव्य मराठी