सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात केलेल्या कार्याचे अनुभवकथन करतांना अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर म्हणाले, सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात अभियानाला अक्षय्य तृतीयेच्या दिवसापासून प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे समाजामध्ये दुष्प्रवृत्तींविरुद्ध जागृती होण्यास प्रारंभ झाला आहे. दुर्बल आणि गरीब घटकांसाठी रुग्णालयांमध्ये जागा आरक्षित ठेवण्याविषयी रुग्णालये, प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये जागृती करण्यात आली. त्यामुळे संभाजीनगरमधील धर्मादाय आयुक्तांनी कार्यालयातील सर्व अधिकार्यांची बैठक घेऊन प्रत्यक्ष रुग्णालयांना भेटी देत पंचनामा केला. अशाच प्रकारे पेट्रोलमध्ये होणार्या भेसळीसंबंधी निवेदन दिले. याचा परिणाम म्हणून समाजामध्ये सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात जागृती वाढत आहे. या कार्यामध्ये हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग आणि उत्साहही वाढत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनेच हे अभियान यशस्वी होत आहे.