विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या तृतीय दिनी ‘हिंदूंमध्ये शौर्यजागरण कसे करावे ? ‘ या विषयावर मार्गदर्शन करतांना श्री. अरविंद जैन म्हणाले, हिंदूंचे संख्याबळ अधिक आहे, मात्र हिंदूंकडे आज बाहुबळ आणि विद्याबळ नाही. हनुमंताला त्याच्यातील शक्तीचे स्मरण करून दिल्यावरच त्याने लंकेत जाऊन सीतामातेचा शोध घेतला. हिंदूंनाही त्याच प्रकारे त्यांच्या शौर्याच्या परंपरेचे स्मरण करून देणे आवश्यक आहे. गेली १ सहस्र वर्षे हिंदूंची मोगल आणि ब्रिटीश यांच्याकडून प्रतारणा होण्यामागे शौर्याचे विस्मरण हेच कारण आहे.
त्यासाठी
१. शौर्यजागरण करणारे फलक सार्वजनिक ठिकाणी लावा.
२. हिंदुद्रोही कलाकारांचे चित्रपट पाहू नका. त्यांनी विज्ञापन केलेली उत्पादने वापरू नका. तो पैसा आपल्याच विरोधात आतंकवाद, लव्ह जिहाद करण्यासाठी वापरला जाईल.
३. अन्य पंथियांच्या धर्मस्थळासमोर डोके झुकवू नका. ग्वाल्हेर, बुर्हाणपूर, अजमेर आदी ठिकाणी असलेले दर्गे आणि मजार या ठिकाणी अनेक हिंदू जातात. ही ठिकाणे हिंदूंच्या पैशांवर चालतात.
४. सनातन प्रभात हे हिंदूंचे एकमेव वर्तमानपत्र आहे. त्यामुळे सनातन प्रभात वाचा. बस, रेल्वे प्रवासात लोक दैनिके वाचतात. त्यामुळे सनातन प्रभातच्या प्रती सार्वजनिक ठिकाणी स्वतःसमवेत ठेवा.
५. आम्ही आमच्या क्षेत्रातील संघटनांना एकत्रित करून हिंदू संमेलन भरवले. त्याप्रमाणे शौर्यजागरणासाठी संघटनांचे संघटन करा.
६. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी स्वतःचा अहं सोडून सनातन संस्थेला साथ द्या.