विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : हिंदु धर्माप्रती अभिमान अन् संवेदनशीलता हवी. धर्मावरील आघात प्रतिदिन वाढत असतांना त्या विरोधात निवेदने देणे आदी गोष्टी सतत चालू ठेवणे आवश्यक आहे. हिंदुद्वेष्ट्यांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्यास आम्ही सज्ज आहोत. हिंदु राष्ट्राची आधारशीला ही समान नागरी संहितेतून लागू केली पाहिजे. ती ज्या दिवशी लागू होईल, ती हिंदु राष्ट्राची पहिली पायरी असेल. असे प्रतिपादन वाराणसी येथील बुद्धीमत्ता समूह के साथ भारतचे संस्थापक अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी केले. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १६ जून या दिवशी झालेल्या राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणार्थ केलेल्या संघर्षाच्या अनुभवकथनाच्या सत्रात ते बोलत होते.
हिंदुद्वेष्ट्यांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्यास सज्ज ! – अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी
Tags : हिंदु अधिवेशन