विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : राममंदिर सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय हा न्यायालयीन संघर्ष करून मिळाला आहे. हा निर्णय देणार्या न्यायाधिशांची पदोन्नतीही रोखून धरली गेली होती. त्यासाठीही न्यायालयीन संघर्ष करून न्याय मिळाला. उत्तरप्रदेशमध्ये नवरात्रीच्या काळात दुर्गापूजा करण्यास बंदी करण्यात आली होती. त्या विरोधातही न्यायालयात १८ याचिका प्रविष्ट करून पूजेसाठी अनुमती मिळवण्यात आली. या सर्व न्यायालयीन लढ्याचे यश लेखणीद्वारे संघर्ष करून मिळाले असून त्याद्वारे फार मोठा पालट घडू शकतो. असे प्रतिपादन लखनौ येथील हिंदु फ्रंट फॉर जस्टिसचे अध्यक्ष अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी केले. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १६ जून या दिवशी झालेल्या राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणार्थ केलेल्या संघर्षाच्या अनुभवकथनाच्या सत्रात ते बोलत होते.