विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : हिंदु विधीज्ञ परिषद धर्माच्या बाजूने उभी राहिल्याने धर्मांधांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शासनाने अधिग्रहीत केलेल्या मंदिरांच्या विरोधातही न्यायालयीन प्रक्रिया चालू केल्याने त्या प्रकारच्या मंदिरांमध्ये भ्रष्टाचार करणार्यांना एक प्रकारचा चाप बसला आहे. सर्वसामान्य जनतेला वेळेत न्याय मिळावा आणि धर्मविरोधी कारवायांना चाप बसावा, यांसाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे. असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी केले. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १६ जून या दिवशी झालेल्या राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणार्थ केलेल्या संघर्षाच्या अनुभवकथनाच्या सत्रात ते बोलत होते.