रामनाथ देवस्थान (गोवा), १७ जून (वार्ता.) – अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात १६ जून या दिवशी राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणार्थ केलेल्या संघर्षाच्या अनुभवकथनाचे सत्र झाले. या सत्रात उपस्थित अधिवक्त्यांनी संघटनात्मकरित्या एकत्र येऊन राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ वज्रमूठ करण्याचा निर्धार केला.
या वेळी लखनौ येथील हिंदु फ्रंट फॉर जस्टिसचे अध्यक्ष अधिवक्ता हरि शंकर जैन, वाराणसी येथील बुद्धीमत्ता समूह के साथ भारतचे संस्थापक अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, तमिळनाडू येथील अधिवक्त्या अर्चना जी., ओडिशा येथील अधिवक्ता सुरेश पांडा, ठाणे येथील अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, जळगाव येथील अधिवक्ता निरंजन चौधरी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, परिषदेचे अधिवक्ता चेतन मणेरीकर आणि अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.