विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : भाविक मंदिरांसाठी त्यांची भूमी श्रद्धापूर्वक अर्पण करतात. सध्या मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्या अधिकार्यांकडून याचा अपवापर केला जातो. त्यामुळे केवळ दानधर्म करण्यापर्यंतच मर्यादित न रहाता हिंदूंनी त्याचा योग्य विनियोग होण्याच्या संदर्भातही प्रयत्न करायला हवेत. अर्पण करण्यात आलेल्या भूमीचा धार्मिक कार्यासाठी वापर करण्याचा आग्रह हिंदूंनी धरायला हवा. असे प्रतिपादन तमिळनाडू येथील अधिवक्त्या अर्चना जी. यांनी केले. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १६ जून या दिवशी झालेल्या राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणार्थ केलेल्या संघर्षाच्या अनुभवकथनाच्या सत्रात त्या बोलत होत्या.