विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : दंगलीच्या वेळी निरपराध हिंदुत्वनिष्ठांना लागणार्या जामिनासाठी हिंदु समाजाने पुढे यायला हवे. त्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी स्थानिक भागातील हिंदूंची सूची सिद्ध करायला हवी. हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी स्वतः एका मासात २ खटले लढण्याची सिद्धता ठेवावी. असे प्रतिपादन ठाणे येथील अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांनी केले. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १६ जून या दिवशी झालेल्या राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणार्थ केलेल्या संघर्षाच्या अनुभवकथनाच्या सत्रात ते बोलत होते.
निरपराध हिंदुत्वनिष्ठांना जामीन मिळवून देण्यासाठी हिंदु समाजाने पुढे यायला हवे ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर
Tags : Hindu Adhiveshan