विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : धर्मांधांकडून हिंदूंवर अनेक प्रकारचे अत्याचार करण्यात येतात; मात्र पोलिसांचा ससेमिरा हिंदूंच्या मागे चालू होतो. अशा वेळी निरपराध हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी अधिवक्त्यांनी एकजुटीने आणि ठामपणे उभे राहिले पाहिजे. अशा वेळी अधिवक्त्यांनी पुढाकार घेऊन विविध शासकीय यंत्रणांवर सनदशीर मार्गांचा अवलंब करत योग्य तो दबाव निर्माण केला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीकारकांच्या मागे स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक उभे रहात होते. ती भूमिका सध्याच्या अधिवक्त्यांनी निभावणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन हिंदु विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता चेतन मणेरीकर यांनी केले. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १६ जून या दिवशी झालेल्या राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणार्थ केलेल्या संघर्षाच्या अनुभवकथनाच्या सत्रात ते बोलत होते.