रामनाथी, गोवा – ६ व्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनातील १६ जून या दिवशीच्या लोकशाहीमध्ये पसरलेल्या दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन या विषयावरील उद्बोधन सत्र झाले.
या वेळी तेलंगण येथील शिवसेनेचे राज्यप्रमुख श्री. टी.एन्. मुरारी, पुणे येथील माहिती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे, कोल्हापूर येथील उद्योगपती श्री. आनंद पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख, हिंदु विधीज्ञ परिषदेेचे सदस्य अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर आणि बंगाल येथील शास्त्रधर्म प्रचार सभेचे सचिव डॉ. शिवनारायण सेन उपस्थित होते. या सत्राचे सूत्रसंचालन श्री. सुमीत सागवेकर यांनी केले. या प्रसंगी बडा रामद्वाराचे रामस्नेही संत श्री हरिराम शास्त्री आणि हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड उपस्थित होते.
लोकशाहीमध्ये पसरलेल्या दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन या उद्बोधन सत्रामध्ये वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन
२. तेलंगणमध्ये सर्व पक्षांकडून अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण ! – श्री. टी.एन्. मुरारी
३. भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात उभे राहून वैध मार्गाने संघर्ष करायला हवा ! – श्री. आनंद पाटील, कोल्हापूर
५. आंदोलनात माहिती अधिकाराचा वापर उपयुक्त ! – श्री. चंद्रकांत वारघडे, पुणे
६. हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – डॉ. शिवनारायण सेन, बंगाल
प.पू. परशराम पांडे महाराज यांच्या संदेशाचे वाचन
प.पू. परशराम पांडे महाराज यांनी अखिल भारतीय हिंदु अधिवेशनातील हिंदुत्वनिष्ठांसाठी दिलेल्या संदेशाचे वाचन समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद यांनी केले.