रामनाथी : देशातील अनेक हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी अनेक अपेक्षा ठेवून भाजप शासन हिंदुत्वाच्या सूत्रावर काम करेल, तसेच आतंकवादाच्या विरोधात ठोस भूमिका घेईल, असा विचार करून भाजपला निवडून दिले; मात्र या अपेक्षा पूर्ण होतांना दिसत नाहीत. भाजप शासनाने जर देशातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या खांद्याला खांदा लावून काम केले, तरच भारत इस्लामिक स्टेट होण्यापासून वाचू शकेल, असे मत मुंबई येथील हिंदु हेल्पलाईनचे श्री. पारस राजपूत यांनी व्यक्त केले. ते इसिसचे संकट या विषयावर बोलत होते.
या वेळी श्री. पारस राजपूत म्हणाले…
१. इसिसकडून आज इन्स्पायर नावाचे मासिक चालवण्यात येते. या मासिकात उघडपणे आतंकवादी आक्रमणे करण्याची ५० सूत्रे सांगण्यात आली आहेत. यात बॉम्ब सिद्ध करण्यापासून, लोन वुल्फ (एकट्या वक्तीचे आत्मघातकी पथक) बनून आतंकवादी कारवाया कशा करायच्या, याची माहिती देण्यात आली आहे.
२. आज स्वच्छ भारत अभियान, शौचालय निर्माण यांपेक्षा आतंकवाद निर्मूलन प्राधान्याने करण्याची आवश्यकता आहे.
३. हा देश कॅशलेस करण्यापेक्षा इस्लामिक आतंकवादाच्या छायेतून मुक्त करण्यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत.
४. धर्मांधांचा धर्म हा कर्करोगाप्रमाणे आहे. त्यावर सामाजिक संकेतस्थळांवरून नाही, तर प्रत्यक्ष भूमीवर उतरून प्रत्युत्तर द्यावे लागेल.
हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे शासन आले, असे म्हणतो आणि दुसरीकडे सनातन संस्थेवर बंदी आणल्याची भाषा केली जाते, कर्नाटक-तमिळनाडू-पश्चिम बंगाल येथे हिंदुत्वनिष्ठांची हत्या होत आहे, हे अत्यंत दु:खदायक आहे, असे श्री. राजपूत म्हणाले.
विशेष
अडथळे पार करूनही हिंदु जनजागृती समितीकडून अधिवेशनांचे यशस्वी आयोजन ! – पारस राजपूत
हिंदु जनजागृती समितीने हे ६ वे अधिवेशन आयोजित केले आहे. अनेक अडथळे पार करून हे अधिवेशन होत आहे. गेली ५ अधिवेशने आयोजित करणे हे काम सोपे नाही; मात्र हे काम हिंदु जनजागृती समितीने करून दाखवले, हे विशेष आहे, असे कौतुकोद्गार श्री. पारस राजपूत यांनी काढले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्तपणे भारत माता की, जय हो, वन्दे मातरम की, जय हो, अशा घोषणा दिल्या.