रामनाथी (गोवा) : गीता, गंगा, गायत्री, गुरु हे हिंदु धर्माचे मानबिंदू सध्या असुरक्षित आहेत. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना खोट्या आरोपांखाली अटक केली गेली, साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक करून ९ वर्षे कारागृहात छळ करण्यात आला. आमच्या संतांवरील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. देशाला उघडपणे आव्हान देणार्या शक्ती या देशात कार्य करत आहेत. गाय उघडपणे कापणार्यांवर नव्हे, तर गायीला भाकरी देणार्यांवर कारवाई होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आदी देशभक्तांचे आमच्यावर ऋण आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे अपूर्ण कार्य आम्हाला पूर्ण करायचे आहे. हे एका संघटनेचे कार्य नाही. संघटितपणे आम्हाला हे कार्य करायचे आहे. आपणा सर्व संघटनांचे हे दायित्व आहे.
‘विकास-निर्मूलनासाठी नामजप भाग १, २ आणि ३’ या सनातनच्या हिंदी भाषिक ग्रंथाचे प्रकाशन
या वेळी ‘विकास-निर्मूलनासाठी नामजप भाग १, २ आणि ३’ या सनातनच्या हिंदी भाषिक ग्रंथाचे प्रकाशन साबरमती, कर्णावती, गुजरात येथील संतश्री आसारामजी आश्रमाच्या धर्मप्रचारक साध्वी रेखा बहन, हिंदूभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड, शिवसेनेचे तमिळनाडू राज्य अध्यक्ष श्री.जी. राधाकृष्णन् आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक या मान्यवरांच्या हस्ते झाले.