Menu Close

देशातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सनातन संस्थेच्या खांद्याला खांदा लावून काम करावे ! – ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल

श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल

रामनाथी (गोवा) : हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या अनेक संघटना देशात आहेत; मात्र हे कार्य करतांना साधनेचा पाया ठेवून कार्य करणारी संस्था म्हणजे केवळ सनातन संस्था आहे. साधना केल्यावर काय होते, याची अनुभूती मी स्वत: घेतली असल्याने प्रत्येकाने साधना करायला हवी, हे मी ठामपणे सांगू शकतो. हिंदुत्वावर आघात करणार्‍या प्रत्येक आघातांच्या विरोधात सनातन संस्था कार्य करते, आंदोलन करते. त्यामुळे देशातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सनातन संस्थेच्या खांद्याला खांद्याला लावून काम करावे, असे आवाहन लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले.

श्री. खंडेलवाल पुढे म्हणाले, जेव्हा जेव्हा तुमच्या क्षेत्रात नवीन पोलीस अधिकारी येईल, त्याची पूर्ण माहिती तुमच्याजवळ ठेवा. तक्रार नोंदवण्यासाठी जातांना अधिवक्त्यांना समवेत घेऊन जा. हिंदुत्वाचे कार्य करतांना हिंदूंच्या मागण्यांसाठी आपण अद्यापही देशव्यापी दबावगट निर्माण करू शकत नाही, याची खंत आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *