Menu Close

प्रत्यक्ष कृतीद्वारे हिंदूंमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला ! – श्री. राजन गुप्ता

श्री. राजन गुप्ता

रामनाथी (गोवा) : संघटनेकडून झालेल्या कार्याचा आढावा देतांना अलवर, राजस्थान येथील हिंदु शक्ती वाहिनीचे श्री. राजन गुप्ता म्हणाले, हिंदूंना त्यांच्या धर्मग्रंथांविषयी माहिती आहे; मात्र अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांविषयी माहिती नाही. ही माहिती देऊन त्यांच्यामध्ये जागृती आणण्याचे काम केले. बॉलिवूडच्या माध्यमातून कशाप्रकारे मुसलमान अभिनेत्यांचे उदात्तीकरण चालू आहे, याची जागृती करून शाहरूख खानचा दिलवाले हा चित्रपट बंद पाडला. आमच्या परिसरात धर्मांधांकडून भूमीवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंना संघटित करून प्रत्यक्ष कृती करण्यास भाग पाडले. हिंदूंना संघटित करून त्यांना त्यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात यशस्वी लढा दिला.

इसिस, लव्ह जिहाद, राष्ट्र-धर्म कार्य करतांना हिंदूंना होणारा विरोध, धर्मांधांच्या वाढत्या कारवाया अशा अनेक समस्या हिंदूंच्या समोर आहेत. या समस्यांना उत्तर देण्यासाठी हिंदूंचे संघटन, अधिवक्त्यांचे साहाय्य आणि हिंदूंमध्ये शौर्यजागरणही करावे लागेल, असा सूर भारत-इस्लामिक स्टेट किंवा हिंदु राष्ट्र या चर्चासत्रातून व्यक्त झाला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *