रामनाथी, गोवा : बांगलादेशातील अत्याचारित आणि पीडित हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी बांगलादेशात स्वतंत्र भूमी देण्यासाठी भारत शासन आणि हिंदुत्वनिष्ठांनी साहाय्य करून तेथील शासनावर दबाव आणला पाहिजे. तेथील अल्पसंख्य हिंदूंना स्वतंत्र भूमी दिल्यास आम्ही तेथे हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन बंगाल राज्यातील दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील निखील बंग नागरी महासंघाचे श्री. सुभाष चक्रवर्ती यांनी केले. अधिवेशनातील चौथ्या दिवशीच्या प्रथम सत्रामध्ये बांगलादेश मधील हिंदूंच्या अधिकारांसाठी लढाई या विषयावर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,
१. धर्मांधांनीच हिंदूंवर अत्याचार करत देशाचे तुकडे केले आहेत. आताही धर्मांध भारताचे तुकडे करून इस्लामी राष्ट्र करण्याचे प्रयत्न चालू असून ते रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आणायला हवे.
२. भारत आणि बांगलादेश येथील हिंदूंवर अत्याचार होत असून ते रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी लोकप्रतिनिधींना ठामपणे सांगितले पाहिजे की, हिंदूंवर अन्याय केल्यास तुम्हाला मते मिळणार नाहीत आणि आमच्या मतांवर निवडून आल्यावरही अन्याय झाल्यास तुम्हाला सत्ता सोडून द्यावी लागेल.
३. पंतप्रधान मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी देशात सत्ता आल्यास बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देऊ, असे सांगितले होते. सत्ता येऊन ३ वर्षे झाली असून मोदी यांनी किती बांगलादेशी घुसखोरांना हाकलून दिले, ते सांगावे.
४. भारतात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथून येणार्या हिंदू शरणार्थींना घटनात्मक दर्जा देऊन सुविधा दिल्या जातात; परंतु बांगलादेशमधून येणार्या हिंदू शरणार्थींना तसा दर्जा अन् सुविधा दिल्या जात नाहीत.