Menu Close

ओडिशातील भद्रक, जगतसिंगपूर आणि काकतपूर येथे धर्माभिमान्यांच्या हिंदूसंघटन बैठकांत हिंदु जनजागृती समितीकडून मार्गदर्शन

राऊरकेला (ओडिशा) : ओडिशा राज्यातील भद्रक, जगतसिंगपूर आणि काकतपूर येथील हिंदु धर्माभिमान्यांकडून हिंदूसंघटन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी मार्गदर्शन केले.

भद्रक येथे धर्माभिमानी श्री. अश्‍विनी पाघी यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी राष्ट्र आणि धर्म यांची सद्य:स्थिती, त्यामागील कारणे आणि हिंदु राष्ट्र निर्मितीची आवश्यकता या विषयांवर श्री. प्रकाश मालोंडकर म्हणाले की, धर्मरक्षणासाठी प्रत्येक हिंदूने धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. तरच तो धर्मजागृती करून धर्मसंघटनाचे कार्य करू शकेल.

या बैठकीस नेताजी सुभाष वाहिनी, जगद्गुरु कृपालु परिषद इत्यादी संघटनांचे प्रतिनिधी तसेच शहरातील अन्य धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व धर्माभिमान्यांनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी अशा प्रकारची माहिती आम्हाला प्रत्येक १५ दिवसांनी देण्यात यावी, अशी विनंती केली.

जगतसिंगपूर येथे श्री. शुभेंदू रथ यांनी, तर पुरी जिल्ह्यातील काकतपूर येथील काही धर्माभिमानी युवकांनी हिंदूसंघटन बैठकांचे आयोजन केले होते. या वेळी श्री. प्रकाश मालोंडकर यांनी उपस्थित युवकांना राष्ट्र आणि धर्म यांवर होत असलेल्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी तन, मन आणि धन यांचा त्याग करून राष्ट्र आणि धर्मजागृतीच्या या कार्यात सहभाग घ्यायला हवा, असे प्रतिपादन केले. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले.

जगतसिंगपूर येथील बैठकीस बजरंग दलाचे माजी जिल्हा अध्यक्ष श्री. सुरेशकुमार चौधरी आणि सध्याचे बजरंग दल जिल्हा अध्यक्ष श्री. मानसरंजन स्वाईन उपस्थित होते. श्री. चौधरी यांनी जगतसिंगपूर येथील आपल्या गावात बैठकीचे आयोजन करण्याची विनंती केली. काकतपूर येथील युवा धर्माभिमानी श्री. शिवप्रसाद दीक्षित यांनी प्रत्येक १५ दिवसांनी पुन्हा अशा प्रकारच्या बैठकीचे नियोजन अजून चांगल्या प्रकारे करूया, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *