अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी झालेले हिंदु राष्ट्र-स्थापनेची दिशा या विषयावरील उद्बोधन सत्र
रामनाथी (गोवा) : अधर्माचरण हे सर्व समस्यांचे मूळ कारण असल्याने हिंदूंना धर्मशिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. सामाजिक दृष्प्रवृतींच्या विरोधात संघर्ष करण्याची भावना जागृत करणे आवश्यक आहे. हिंदु धर्माची बाजू मांडणारे प्रवक्ते सिद्ध करणे, राष्ट्रीय हिंदू आंदोलन हा उपक्रम राबववणे, तसेच राजकीय पक्षांसमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदूंसाठीच्या धार्मिक मागण्या करणे या माध्यमांतून हिंदुत्वनिष्ठांचे संघटन करणे आवश्यक आहे. देशभरातील लहान-मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना शारीरिक पातळीवर, तर विचारवंत आणि हिंदुत्वनिष्ठ नियतकालिके वैचारिक पातळीवर राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणाचे कार्य करत आहेत. हे कार्य सर्वांनी संघटितपणे केल्यास ते अधिक परिणामकारक होईल. असे आवाहन हिंदु जनजागृती समिती चे श्री. सुनील घनवट यांनी केले. ते ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ या उद्बोधन सत्रात बोलत होते.
श्री. सुनील घनवट म्हणाले, अधिवेशनाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या ३४२ हिंदुत्वनिष्ठांद्वारे हिंदु राष्ट्राचा विचार लक्षावधी लोकांपर्यंत पोचला आहे.