रामनाथी (गोवा) : आज शिक्षणात वेद आणि धर्मशास्त्र शिकवले जात नाही. शासकीय शाळांमध्ये केवळ निधर्मीवादच शिकवला जातो. हिंदु राष्ट्राचे बीज प्रथम शिक्षणक्षेत्रात रोवायला हवे. हिंदु राष्ट्र येणारच असून तोपर्यंत राज्यघटनेच्या आधारे अपप्रवृत्तींच्या विरोधात प्रयत्न करायला हवेत. गेल्या १ सहस्र वर्षांत हिंदूंवर जो अन्याय झाला आहे, तो दूर करण्यासाठी प्रतिकार करून हिंदु राष्ट्र आणायचे आहे. जेएनयूमध्ये घोषणा दिली जाते की, घराघरातून अफझल बाहेर येतील. आम्ही सांगू इच्छितो की, जर घराघरातून अफझल येणार असतील, तर घराघरातून श्रीरामाचे भक्त बाहेर येतील आणि अफझलला बाहेर खेचतील. अनेक जिहादी संघटना आणि इसिससारखी आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना जगभर इस्लामी राष्ट्र आणण्यासाठी प्रयत्नरत असून त्याविरोधात हिंदूंनाही प्रतिकार करून संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. असे प्रतिपादन अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी केले. ते ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ या उद्बोधन सत्रात बोलत होते.