बेंगळुरु (कर्नाटक) : हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच श्री १००८ श्री सत्यात्मा तीर्थ स्वामीजी यांचे दर्शन घेतले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रस्तावित अंधश्रद्धा विरोधी कायद्याविषयी माहिती दिली आणि या कायद्यातील हिंदु धर्मावर आघात करणार्या कलमांविषयी सांगितले. या वेळी स्वामीजी म्हणाले, माझा तुमच्या प्रस्तावित अंधश्रद्धा विरोधी कायद्याविरूद्धच्या चळवळीला संपूर्ण पाठिंबा आहे. मी स्वतः याविषयी शासनाला पत्र लिहिन आणि या कायद्याला विरोध करण्यासाठी माझ्या भक्तांनाही माहिती देईन. या वेळी समितीचे श्री. मोहन गौडा आणि अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात