श्री विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : एखादे हिंदु संत किंवा संघटना यांवर अन्याय होतो, तेव्हा तो केवळ त्या एका व्यक्तीवर किंवा व्यक्तीसमूहावर परिणाम करतो, असे नाही. अशी घटना संपूर्ण हिंदुत्वाच्या क्षेत्रावर परिणाम करणारी असते. हिंदुविरोधी गटांना त्यामुळे बळ मिळते. त्यामुळे हिंदूंचे सर्व क्षेत्रांतील दमन रोखण्यासाठी हिंदूंचे सांप्रदायिक ऐक्य असणे, अपरिहार्य आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते १६ जूनला सायंकाळी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सांप्रदायिक ऐक्य या संदर्भातील समांतर सत्राचे सार मांडत होते. या वेळी लष्कर-ए-हिंदचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पू. बाबा फलाहारी महाराज, डासना, उत्तरप्रदेश येथील सिद्धपीठ श्री प्रचंड चंडीदेवी मंदिराच्या यति मां चेतनानंद सरस्वती आणि जोधपूर, राजस्थान येथील रामस्नेही संत श्री हरिराम शास्त्री यांनीही मार्गदर्शन केले.
पू. डॉ. पिंगळे पुढे म्हणाले की,
१. एखादी हिंदु संघटना किंवा संत यांवर अन्याय झाल्यानंतर देशभरातील हिंदु संघटनांनी त्याविरुद्ध आंदोलन केले पाहिजे. त्या संदर्भात शासनाला निवेदन देण्यासारख्या वैध कृती आपण नक्कीच करू शकतो.
२. अशा अन्यायाविरुद्ध आपण स्वाक्षरी मोहीम राबवून किंवा पत्रकार परिषद घेऊन देशभरातील हिंदूंचा संबंधित संत किंवा संघटना यांना पाठिंबा असल्याचे दाखवून द्यावे.
३. लक्षात घ्या, हा धर्म विरुद्ध अधर्म असा लढा असल्याने आपण संघटितपणे अधर्माला पराजित करायचे आहे.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सांप्रदायिक ऐक्य या सत्रात अन्य वक्त्यांनी व्यक्त केलेले विचार
१. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संतांनी एकत्र यावे ! – पू. बाबा फलाहारी महाराज
२. धर्मासाठी कितीही वेळा कारागृहात जाण्यास सिद्ध ! – यति मां चेतनानंद सरस्वती
३. भारत म्हणजे हिंदू आणि हिंदू म्हणजेच भारत ! – संत श्री हरिराम शास्त्री