श्री विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : डासना, उत्तरप्रदेश येथील सिद्धपीठ श्री प्रचंड चंडीदेवी मंदिराच्या यति मां चेतनानंद सरस्वती म्हणाल्या की, हिंदु धर्मासाठी कार्य करत असतांना माझे गुरु यति नरसिंहानंद सरस्वती महाराज ३१ वेळा कारागृहात गेले. आम्हालाही अनेकदा कारागृहात जावे लागत असले, तरी आम्ही हिंदु धर्माचे कार्य सोडणार नाही. (यति मां चेतनानंद सरस्वती यांच्यासारखे संत हीच हिंदु धर्माची खरी शक्ती ! – संपादक) देशात ८० टक्के असलेले हिंदू लढणेच विसरले आहेत. त्यामुळे आम्ही स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण देतो. कायदासंमत असलेली शस्त्रे बाळगून स्वतःचे रक्षण करणे, हा आपल्या सर्वांचा अधिकार आहे. आता केवळ राधा-कृष्ण यांच्या कथा वाचनाची नव्हे, तर धर्मासाठी कृती करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आध्यात्मिक बळ वाढावे, याकरता डासना पिठाच्या वतीने यज्ञयागादी करण्यात येतात. जाती-जातींत विखुरलेल्या हिंदूंच्या संघटितपणासाठी प्रयत्न केले जातात.