Menu Close

Video : पाक चाहत्याने गांगुलीशी केले गैरवर्तन

लंडन : पाकिस्तानी फॅन्सने सौरव गांगुलीसोबत गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडोमध्ये एकाने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारच्या बोनेटवर पाकिस्तानचा झेंडा टाकल्याचे दिसत आहे. गांगुली तेथील गर्दीमध्ये पूर्णपणे फसला असल्याचे दिसतेय. त्या गर्दीतून तो बाहेर निघणे जवळजवळ कठीणच बनले होते. पण त्याने संयम बाळगून या प्रसंगाला हसतमुखाने सामोरे जात गर्दीला अभिवादन करत हळूच बाहेर पडला.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ तसा जूना आहे. भारतावर मात करत पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. पाकिस्तान- इंग्लंड यांच्यातील सेमीच्या सामन्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. हा सामना पाकने जिंकला होता. त्यांनी इंग्लंडचा ८ गड्यांनी पराभव केला होता. सामन्यानंतर गांगुली स्टेडिअमबाहेर त्याच्या कारमध्ये होता. त्याच्या कारभोवती पाकिस्तानी चाहत्यांनी गराडा घातला. त्यांनी पाकिस्तानच्या विजयाची घोषणा देण्यास सुरूवात केली. गांगुलीला पाकिस्तानी झेंडे दाखवू लागले. कारमध्ये असलेल्या गांगुलीने अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळली. तो कारमध्येच बसून पाकिस्तानी चाहत्यांना प्रत्युत्तर न देता त्यांना अभिवादन करताना व्हिडिओत दिसत आहे.

संदर्भ : लोकमत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *