पुणे : कोथरूड आणि चिंचवड येथे ११ जून या दिवशी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले होते. भर चौकात गोहत्या करणार्या केरळमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, बंदी घातलेल्या झाकीर नाईकची शाळा चालवायला घेणार्या अबू आझमी यांची चौकशी करावी, साध्वी प्रज्ञासिंह यांना खोट्या आरोपांखाली कारागृहात डांबून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर धर्मविरोधी रासायनिक लेपन करून मूर्तीशी खेळणारे कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंदवावेत आणि धर्मशास्त्रसंमत नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, या मागण्या आंदोलनाच्या वेळी करण्यात आल्या होत्या. १४ जून या दिवशी नायब तहसीलदार तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी हेमंत निकम यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी श्री. विनोद कावळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आणि श्री. शशांक सोनवणे उपस्थित होते. हेमंत निकम यांनी निवेदनाचे विषय ऐकून घेऊन ते जिज्ञासेने वाचले. समिती करत असलेले कार्य चांगले आहे आणि तुमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवू, असे निकम यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात