भारतातील आतंकवाद्याला भारत नव्हे, तर अमेरिका आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करते, हे भारताला लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
वॉशिंग्टन : मूळचा कर्नाटक राज्याच्या भटकळ येथील असणारा आणि आता सिरियामध्ये राहून भारतीय मुसलमान तरुणांची इसिसमध्ये भरती करणारा ३० वर्षीय शफी अरमर याला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय आतंकवादी म्हणून घोषित केले आहे. भारतातील आतंकवाद्याला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय आतंकवादी म्हणून अमेरिकेने घोषित केले आहे.
अरमरच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. तो छोटे मौला, अनजान भाई आणि यूसुफ अल-हिंदी या नावांनी ओळखला जातो. अरमरचे नाव अमेरिकेच्या ऑफिस ऑफ फॉरेन अॅसेट्स कंट्रोल ऑफ द यूएस् ट्रेजरी डिपार्टमेंटच्या सूचीतही समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे त्याच्यावर आर्थिक निर्बंध लादता येणार आहेत.
अमेरिकेच्या माहितीनुसार अरमर हा भारतातील तरुणांची इसिसमध्ये भरती करणारा प्रमुख होता. त्याने इसिसचे अनेक हितचिंतक निर्माण केले. हे हितचिंतक भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी साहाय्य करत आहेत. रियाज भटकळ आणि यासिन भटकळ यांच्यात भांडण झाल्यानंतर अरमर याने अंसार-उल-तौहिद ही संघटना बनवली. ही संघटना नंतर इसिसशी संलग्न झाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात