दी मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट आणि श्री समर्थ स्टॉल धारक संघटना यांचा संयुक्त उपक्रम – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : येथे जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वकर महाराज यांच्या पालख्यांचे आगमन १८ जून या दिवशी झाले. त्या पार्श्वभूमीवर दी मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट आणि श्री समर्थ स्टॉल धारक संघटना यांनी संयुक्तरित्या वारकऱ्यांसाठी ‘इफ्तार’ मेजवानीचे आयोजन केले होते. या वेळी दि मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे कार्याध्यक्ष मुश्ताक पटेल यांसह अनेक कार्यकर्ते, तर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वसर महाराज यांच्या पालखीमधील दिंडीकरी ह.भ.प. अशोक इगावे यांसह काही वारकरी सहभागी झाले होते. (इस्लामच्या शिकवणीनुसार ‘अन्य धर्मीय हे काफीरच असतात’, त्यामुळे हिंदूंसाठी ही अयोग्य कृती म्हणजे आत्मघातच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ट्रस्टचे रशीद खान यांनी सांगितले की, रमजान मासाचा पवित्र उपवास वारकरी बांधवांसमवेत आम्ही सोडत आहोत. ही एकतेची भावना सर्व जातीपातीच्या भिंती तोडून एकत्र येण्याचा संदेश देते. ह.भ.प. अशोक इगावे यांनी सांगितले की, आपण सर्व एकच आहोत. प्रत्येकाचा धर्म जरी वेगळा असला, तरी सर्वांचे रक्त एकच आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात