Menu Close

(म्हणे) ‘संभाजी भिडे गुरुजी यांना पुणे शहरात येण्यास बंदी घाला !’ – अरविंद शिंदे, काँग्रेस गटनेते

असे आहे, तर शिखांचे हत्याकांड करणाऱ्यां, घोटाळेबाज आणि देशद्रोही असणाऱ्यां सर्वच काँग्रेसी नेत्यांना पुण्यात बंदी घालायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

अरविंद शिंदे, काँग्रेस गटनेते

पुणे : शहराला पालखीची परंपरा असून पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. या शहरात भिडेगुरुजींच्या समर्थकांनी पालखी सोहळ्याच्या कालावधीत केलेला प्रकार निषेधार्थ आहे, तसेच पुढील काळात गणेशोत्सवासारखे आयोजन शहरात होणार असून यामध्ये संभाजी भिडेगुरुजी यांच्यामुळे अनुचित प्रकार घडू शकतात. त्यामुळे त्यांना पुणे शहरात येण्यास बंदी घालावी, अशी विखारी मागणी महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केली. (यावरून काँग्रेसजनांच्या बुद्धीची कीव करावी, तेवढी थोडीच ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) माऊलींच्या पालखीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी १८ जून या दिवशी घेतलेल्या सहभागाविषयीच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी २० जूनला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ते पुढे म्हणाले की, या प्रकरणी पोलिसांनीही हलगर्जीपणा केला आहे. पालखी सोहळ्यात मानाच्या दिंड्यांमध्ये संभाजी भिडेंचे कार्यकर्ते अचानक तलवारी घेऊन शिरतांना पोलीस काय करत होते ? (कार्यकर्तृत्व आणि वय यांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीचा एकेरी नावाने उल्लेख करणारे काँग्रेसचे नैतिकतेचा अभाव असलेले अरविंद शिंदे ! अशा काँग्रेसी नेत्यांमुळेच समाजातील नैतिकता रसातळाला गेली आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *