अमेरिका केवळ विचार करत बसणार नाही, तर प्रत्यक्षात कृतीही करील; मात्र भारत विचार आणि कृती दोन्ही करण्याची शक्यता नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
वॉशिंग्टन : आतंकवादी कारवायांमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासन पाकिस्तानवर नाराज आहेत. पाकमधील आतंकवाद्यांच्या तळावर ड्रोनद्वारे हवाई आक्रमण करण्याचा विचार अमेरिका करत आहे. तसेच पाकला दिले जाणारे आर्थिक साहाय्य थांबवणे किंवा मित्रराष्ट्र म्हणून पाकला दिलेला दर्जा न्यून करणे या पर्यायांवरही ट्रम्प प्रशासन विचारविनिमय करत असल्याचे एका अधिकाऱ्यांने सांगितले; पण काही अधिकारी या गोष्टींच्या विरोधात आहेत. अफगाणिस्तानमध्ये अमेरिका लढत असलेल्या युद्धास आता १६ वर्षे पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाकडून सध्या या रखडलेल्या युद्धाचे अभ्यासपूर्ण अवलोकन करण्यात येत आहे. पाकमधील आतंकवाद्यांच्या तळांवर मिळणाऱ्यां आश्रयामुळे तालिबानला अफगाणिस्तानमध्ये आक्रमण करणे शक्य होत आहे. यामुळेच हे आक्रमण करण्याची शक्यता आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात