अमेरिकेतील हिंदूंचे अभिनंदन !
छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात
लॉस एन्जेलिस : चॅट्सवर्थ येथे मुख्यालय असलेले ऑनलाइन विक्री करणारे आस्थापन ‘हिपस्टर वंडरलॅण्ड’ने हिंदूंची देवता श्री गणेशाची प्रतिमा छापलेले पायमोजे विक्रीस ठेवले होते. या विरोधात हिंदूंनी निषेध व्यक्त करताच काही घंट्यांतच आस्थापनाने हे पायमोजे मागे घेतले. (कुठे हिंदूंच्या देवतांच्या विडंबनाच्या विरोधात तात्काळ निषेध करणारे अमेरिकेतील हिंदू, तर कुठे विविध माध्यमांद्वोरे हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ, संत यांचे विडंबन होत असतांना निद्रिस्त रहाणारे भारतातील हिंदू ! भारतातील हिंदूंनी अमेरिकेतील हिंदूंकडून धर्माभिमान शिकावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात