बांगलादेश येथे अल्पसंख्य असलेल्या हिंदूंची दुःस्थिती ! भारतात अल्पसंख्यांकांवरील आक्रमणाची एखादी घटना घडली, तरी असहिष्णुतेच्या नावाने गळा काढणारे तथाकथित धर्मनिरपेक्षतावाले आणि मानवाधिकारवाले बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरील या अत्याचारांविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बांगलादेश : ६ मार्च २०१७ या दिवशी बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांचे भाऊ ज्योतिंद्र घोष यांचे देहावसान झाले. त्यामुळे भावाच्या अंत्यसंस्कारांसाठी अधिवक्ता घोष हे ढाका येथून चितगांव येथे आले होते. १० मार्च २०१७ या दिवशी सकाळी ७.३० वाजता स्वर्गीय ज्योतिंद्र घोष यांच्या अंत्यसंस्कारांसाठी सायकलरिक्शाने रवींद्र घोष आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. कृष्णादेवी घोष जात होते. त्या वेळी धर्मांधांनी त्यांच्या सायकलरिक्शाला धडक दिली आणि ते पळून गेले. या आक्रमणात रवींद्र घोष यांना फारसे लागले नाही; मात्र सौ. कृष्णादेवी घोष यांना गंभीर दु:खपात झाली.
श्री. रवींद्र घोष शुद्धीत असल्याने त्यांनी घटनास्थळी बांगलादेशी पोलिसांना बोलावले आणि त्याविषयी अधिकृत तक्रार नोंदवली. रवींद्र घोष यांनी पोलिसांच्या साहाय्याने सौ. कृष्णादेवी घोष यांना चितगांव वैद्यकीय महाविद्यालयात मध्ये दाखल केले. या आक्रमणात झालेल्या दुखापतीमुळे सौ. कृष्णादेवी यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आणि दीड मास त्यांना रुग्णालयात रहावे लागले. श्री. घोष यांनी प्रविष्ट केलेल्या तक्रारीविषयी बांगलादेश पोलिसांकडून आतापर्यंत काहीही कृती करण्यात आलेली नाही. (बांगलादेशमध्ये सर्वच स्तरांवर हिंदूंचे दमन चालू आहे. त्यामुळेच भर रस्त्यात वृद्ध हिंदु दांपत्यावर आक्रमण होऊनही पोलीस तीन महिन्यांनंतरही कोणतीच कारवाई करत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात