धर्मांधांना शांत करण्यासाठी अधीक्षकाने मागितली धर्मांधांची क्षमा !
नेल्लोर : ३० जानेवारीला येथील धर्मांध जिहादी एकत्र येऊन त्यांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
१. एका राजकीय पक्षाच्या धर्मांध नेत्याने एका हिंदु पोलीस अधिकाऱ्याने बुरख्यावर आक्षेपार्ह टिपणी केली, अशी अफवा पसरवली.
२. याचे निमित्त करून धर्मांध मोठ्या संख्येत एकत्र आले आणि त्यांनी वन टाऊन पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. (कुठे अफवेवरून हिंसा करणारे धर्मांध, तर कुठे प्रत्यक्षात धर्माचा अवमान होऊनही त्याचा वैध मार्गानेही विरोध न करणारे हिंदू ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. स्थानिक पोलीस अधीक्षक गजराव भूपाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी धर्मांधांना शांत करण्याचा प्रयत्न केला; परंतु संतापलेल्या धर्मांधांनी अधीक्षकाच्याच चारचाकी गाडीवर आक्रमण करत गाडीच्या काचा फोडल्या. त्यामुळे भूपाळ यांनी तेथून काढता पाय घेतला. (स्वतःचे रक्षणही न करू शकणारे पोलीस अधिकारी जनतेचे रक्षण काय करणार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. शेवटी पोलिसांनी हवेत गोळीबार करून धर्मांधांना शांत केले.
५. नंतर अधीक्षक भूपाळ यांनी धर्मांधांची क्षमा मागत स्पष्ट केले की, बुरख्यावर कोणत्याच पोलीस अधिकाऱ्याने काही टीका केलेली नाही. (यावरून धर्मांधांना कायदा-सुव्यवस्थेशी काही देणे-घेणे नसते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याबरोबरच संघटनाच्या बळावर पोलिसांना वाकवणाऱ्या धर्मांधांची जिहादी वृत्ती दिसून येते. दादरीसारख्या घटनांना डोक्यावर घेऊन देशात असहिष्णुता वाढली असल्याची बोंब ठोकणारी प्रसारमाध्यमे आता अशा वृत्तांवर मूग गिळून गप्प बसली आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात