कुठे परदेशी नागरिकांवर कर लावणार सौदी अरेबिया, तर कुठे घुसखोरी करून कोणताही कर न भरता देशातील सर्व साधनसुविधांचा लाभ घेणारे भारतातील बांगलादेशी घुसखोर ! भारतीय शासनकर्ते सौदी अरेबियाकडून काही शिकतील का ?- संपादक, दैनिक सनातन प्रभात
रियाध : सौदी अरेबियामध्ये १ जुलैपासून परदेशी कुटुंबातील प्रत्येक अवलंबित सदस्यासाठी प्रतिमास १ सहस्र ७०० रुपये इतका कर भरावा लागणार आहे. सौदीच्या राजाने तेथील परदेशी नागरिकांच्या कुटुंबासाठी हा कर लागू केला आहे. हा कर परवडणार नसल्याने अनेक भारतीय कुटुंबे परतीच्या मार्गावर आहेत. सौदी अरेबियात सध्या सुमारे ४१ लाख भारतीय रहातात. सौदी अरेबियात ज्यांचे मासिक उत्पन्न सुमारे ८६ सहस्र रुपये आहे, त्यांना कौटुंबिक व्हिसा मिळतो. एका कुटुंबात एक पत्नी आणि २ मुले असतील, तर त्या कुटुंबप्रमुखाला ५ सहस्र १०० रुपये प्रतिमास भरावे लागणार आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात