- पुणे येथे ‘लव्ह जिहाद’ची आणखी एक घटना उघडकीस !
- मुलीसमान तरुणीला पळवून नेणारे वासनांध धर्मांध !
पुणे : एका २२ वर्षीय हिंदु युवतीला स्वतःची मुलगी मानत असल्याचे सांगून हाजी महंमद शेख या ५० वर्षीय धर्मांधाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी हिंदु युवतीच्या आईने धर्मांधाच्या विरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे.
या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी शेख याला बोलावून घेतले. त्याने प्रारंभी पोलिसांना उडवीउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच मुलीला पोलीस ठाण्यात उपस्थित केले. त्या वेळी हिंदु मुलगी पूर्णपणे मुसलमान वेशात होती. (यावरून हिंदु युवतींना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! ‘लव्ह जिहाद’चे वाढते लोण रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या निर्मितीला पर्याय नाही. – संपादक)
या विषयीचे सविस्तर वृत्त असे…
१. हिंदु मुलगी ज्या आस्थापनात काम करत होती, त्याच आस्थापनात हाजी महंमद शेख हा ५० वर्षीय धर्मांध काम करत होता.
२. ‘हिंदु युवती मला माझ्या मुलीसारखी आहे’, असे सांगून हा धर्मांध मुलीच्या घरी येत असे.
३. १० नोव्हेंबर २०१५ या दिवशी हिंदु युवती तिच्या घरातून अचानक गायब झाली. या प्रकरणी युवतीच्या आईने संत तुकारामनगर पोलीस चौकीत मुलगी हरवल्याची तक्रार दिली.
४. युवतीची चौकशी करत असतांना जवळपास २ महिन्यांनी हाजी शेख या धर्मांधाने या या युवतीला फूस लावून पळवून नेल्याचे उघड झाले.
५. या सगळ्या प्रकरणात शेख याने हिंदु कुटुबियांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी युवतीच्या आईने तक्रार केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात