Menu Close

आश्वी बुद्रुक (जिल्हा नगर) येथे धर्मांधांकडून पूर्ववैमनस्याच्या कारणावरून दंगल !

१ जण घायाळ आणि ८ धर्मांधांवर गुन्हा प्रविष्ट

क्षुल्लक कारणांवरून दंगल करणाऱ्यां धर्मांधांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि उद्दाम धर्मांधांची हिंदूंवर प्रतिदिन होणारी आक्रमणे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे  ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नगर : येथील आश्वी बुद्रुकमधील सोनू राखपसरे या युवकाची गावातील एका धर्मांधाशी ३ दिवसांपूर्वी वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरून धर्मांधांनी राखपसरे याला २० जून या दिवशी लोखंडी गजाने (रॉड) मारहाण केली. त्यामुळे राखपसरे हे गंभीर घायाळ झाले आहेत. या प्रकरणी स्थानिकांनी विरोध करत धर्मांध आणि हिंदू यांनी एकमेकांवर, तसेच दुकानावर दगडफेक केली. या प्रकरणी आश्वी पोलिसांनी अर्शद सिकंदर शेख यांसह ८ जणांवर दंगलीचा गुन्हा प्रविष्ट केला आहे. पोलीस ठाण्यासमोर दगडफेक करणारा जमाव आल्यानंतर पोलिसांनी एकूण परिस्थिती आवाक्यात आणली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संगमनेर येथील दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले आहे. दंगलीचा परिणाम म्हणून अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *