काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी आणि जिहाद्यांनी हिंदूंच्या मंदिरांतील प्रथम मूर्ती आणि नंतर मंदिरेच तोडली, त्याच घटना आता जम्मूत होऊ लागत असतील, तर ते सरकारचे अपयशच आहे ! – संपादक, हिंदुजागृति
जम्मू : येथील त्रिकुटनगरातील एका मंदिरात हनुमान मूर्तीचे विडंबन केल्याच्या विरोधात संतप्त हिंदूंनी २२ जून या दिवशी आंदोलन केले आणि सकाळी रस्ते रोखले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी काही भाविकांना हनुमानाच्या मूर्तीचे तुकडे करून टाकल्याचे दिसून आले. तसेच मूर्तींच्या समोर असलेली संरक्षक काचही फोडण्यात आली होती. ही बातमी पसरताच जम्मूचे बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यास प्रारंभ केला. बजरंग दलचे अध्यक्ष राजेश गुप्ता म्हणाले, ‘‘प्रतिवर्षी अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू विभागात काही समाजकंटक दहशतीचे वातावरण निर्माण करतात.’’ पोलिसांनी या घटनेचा तपास चालू केला आहे. मंदिराच्या परिसरात २ मूर्ती होत्या. गुन्हेगारांचा हेतू एखाद्या विशिष्ट समाजाच्या भावना दुखावण्याचा असता, तर त्यांनी दोन्ही मूर्ती मोडल्या असत्या, असे पोलीस अधिकारी विकास गुप्ता म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात