Menu Close

गोशाळेत पाठवलेल्या ५५ गोवंशियांना मिळवण्यासाठी धर्मांधाने केलेला मागणी अर्ज न्यायालयाने फेटाळला

धर्मांध कसायांना अशाच प्रकारे धडा शिकवायला हवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

सातारा : पोलिसांनी कारवाई करून गोशाळेत पाठवलेल्या ५५ गोवंशियांना पुन्हा मिळवण्यासाठी मांस विक्रेता शरीफ कुरेशी याने न्यायालयाकडे मागणीचा अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने ती मागणी फेटाळली. (कावेबाज धर्मांध ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी सातारा येथील अधिवक्ता श्री. मुकुंद सारडा यांनी काम पाहिले. गोवंश रक्षणासाठी श्री. शिवशंकर स्वामी यांना पुणे येथील माजी नगरसेवक श्री. मिलिंद एकबोटे यांचे मार्गदर्शन लाभले. (गोवंश रक्षणासाठी लढणाऱ्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) . २३ मे या दिवशी ५५ गोवंशियांनी भरलेले दोन ट्रक सदरबझार पशूवधगृहाजवळ उभे होते. याविषयी पुणे येथील मानद पशुकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी आणि त्यांचे सहकारी यांनी शहर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यावर कारवाई करत गोवंशियांना फलटण येथील जैन समाजाच्या गोशाळेत पाठवण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *