Menu Close

भ्रमणभाषमधील खेळ खेळण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

वासनांध धर्मांधांपासून आपल्या पोरीबाळींना वाचवण्यासाठी वेळीच सिद्ध व्हा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

आरोपी शेख नावेर

मुंबई : भ्रमणभाषमध्ये खेळ खेळू देण्याच्या आमिषाने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या शेख नावेर या धर्मांध आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेले ६ मास तो पोलिसांना चकवा देत होता. त्याला बिहार येथून अटक करण्यात आली.

१. बलात्काराविषयी कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकीही शेखने तिला दिली होती. पीडित मुलीच्या पालकांनी त्याच्या विरोधात तक्रार दिल्याचे कळताच शेख मुंबई सोडून पळून गेला. पोलीस त्याच्या मागावर असल्याने तो भ्रमणभाषमधील सीमकार्ड सतत पालटून वेगवेगळ्या ठिकाणी रहात होता. (कावेबाज धर्मांध ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. पोलिसांनी तर्क लढवून त्याला भ्रमणभाष आस्थापनाचे पारितोषिक लागल्याचे सांगितले आणि त्याला मुंबईत बोलावण्याचा प्रयत्न केला; पण त्याने बिहारचा पत्ता देऊन पारितोषिक तेथे पाठवण्यास सांगितले.

३. नेहरूनगर पोलिसांनी ४ जणांचे पथक पारितोषिक घेऊन आरोपीच्या पत्त्यावर पाठवले. तेथे पारितोषिकाची वाट पहाणार्‍या नावेदला पोलिसांनी अटक करून मुंबईत आणले. (पोलिसांनी अशा प्रकारे विविध तर्क लढवून सर्वच आरोपींना तात्काळ अटक करणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *