Menu Close

वर्ष १९४७ मध्ये पाकमध्ये २३ टक्के असणारे हिंदु धर्मांतरामुळे केवळ ६ टक्केच राहिले !

  • पाकमधील हिंदू भारतात पलायन करत आहेत, तर भारतातील धर्मांध भारतात   ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा करत आहेत !
  • पाकमधील हिंदूंची ही स्थिती भारतातील निधर्मीवादी का सांगत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

१९४७ मध्ये भारतात ९.८ टक्के असणारे मुसलमान काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांच्या लांगूलचालनामुळे आणि हिंदूंच्या आत्मघातकी निधर्मीवादामुळे १५ टक्के झाले आहेत, तर हिंदू ८४.१ टक्क्यावरून ७८ टक्के झाले आहेत, हे हिंदूंसाठी धोकादायक आहे !

नवी देहली : वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येचे प्रमाण २३ टक्के होते. हे प्रमाण आता ६ टक्क्यांंवर आले आहे. यामागे त्यांचे होणारे सक्तीचे धर्मांतर आणि अत्याचार हे कारण आहे. यामुळे प्रतिवर्षी सुमारे ५ सहस्र हिंदू भारतात पलायन करत आहेत, अशी माहिती ‘एएन्आय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

पाकने त्यांच्या देशात रहाणार्‍या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याची मुभा दिली आहे. प्रत्येक नागरिकाचे मूलभूत हक्क अबाधित रहातील, असे पाकने म्हटले आहे; पण प्रत्यक्षात पाकमध्ये हिंदूंची गळचेपी होत आहे.

१. या वृत्तात म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांचे बळजबरीने मुसलमान तरुणांशी लग्न लावून दिले जाते. यानंतर या मुलींचे धर्मांतरही केले जात आहे.

२.  कनिष्ठ जातीतील हिंदूचे सक्तीने धर्मांतर केले जाते, तर उच्चवर्णीय हिंदूंचे अपहरण करण्याचे प्रमाण वाढत आहे, अशी तक्रार स्थानिक हिंदू संघटनांनी केली आहे.

३. पाकच्या सिंध प्रांतात हिंदूंची संख्या सर्वाधिक असून या भागात हिंदूंना लक्ष्य करण्याचे प्रमाणही दिवसागणिक वाढत आहे.

४. एका सामाजिक संघटनेच्या अहवालानुसार पाकमध्ये प्रतिवर्षी सुमारे १ सहस्र मुलींना सक्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले जाते. सिंध प्रांतात हे प्रमाण महिन्याला सरासरी २० एवढे आहे.

५. पाकमधील हिंदूंची गोपुजेवरून खिल्ली उडवली जाते; मात्र यामुळे आपण हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत असल्याचे त्यांना जाणवत नाही, याकडे पाकमधील हिंदूंसाठी काम करणार्‍या सामाजिक संघटनांनी लक्ष वेधले. ‘प्रत्येक हिंदू हा भारतीय नसतो आणि प्रत्येक भारतीय हा हिंदू नसतो, हे पाकमधील नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे’, असे या संघटनेचे कार्यकर्ते सांगतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *