Menu Close

सोलापूर येथे प्रशासनाकडून राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळीचे कौतुक !

  • शासन, तसेच प्रशासन यांना ३३ निवेदने
  • ९०० प्रबोधन हस्तपत्रकांचे वितरण

सोलापूर : राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शासन, तसेच प्रशासन यांना ३३ निवेदने देण्यात आली, तसेच ९०० प्रबोधन हस्तपत्रकांचे वितरण करण्यात आले. या प्रबोधन चळवळीचे येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.

गेल्या १५ दिवसांपासून ही प्रबोधन चळवळ सांगोला, पंढरपूर, बार्शी, अकलूज, सोलापूर, मंगळवेढा येथे राबवण्यात आली. एकूण ३३ निवेदनांपैकी २ पोलीस आयुक्त, १ तहसीलदार, २१ शाळा, ७ महाविद्यालय, १ शिक्षणाधिकारी, १ जिल्हाधिकारी अशी निवेदन देण्यात आली. या चळवळीच्या अंतर्गत ११० भित्तीपत्रके लावण्यात आली. ३३ वैयक्तिक संपर्क करण्यात आले. ५१ ठिकाणी फलकप्रसिद्धीद्वारे जनजागृती करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *