नवी देहली : त्रिपुरातील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने जवळपास २५ कुटुंबातील २०० मुस्लिमांवर मशिदीत प्रवेश करण्यावर बंदी आणली आहे. मार्क्सवादी पार्टीला सोडून या मुस्लिम कुटुंबांनी भाजपा प्रवेश केला, म्हणून मशिदीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
‘जनसत्ता’ने दिलेल्या वृत्तानुसार, या मुस्लिम कुटुंबांवर मार्क्सवादी पार्टीमध्ये घरवापसी करण्यासाठीही दवाब टाकण्यात आला. तसेच भारतीय जनता पार्टीला न सोडल्यास त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात येईल, अशी धमकी दिली जात आहे. त्रिपुरातील शांतीबाजार परिसरातील हा प्रकार आहे. त्यांना न केवळ मशिदीत जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे तर मनरेगामध्येही काम करण्यापासून वगळण्यात आले आहे.
दक्षिण त्रिपुराचे जिल्हा दंडाधिकारी सी.के. जमातिया यांनी सांगितले की, जर कुणी कोणाच्याही धार्मिक अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत असताना आढळले तर प्रशासन संबंधितांविरोधात कारवाई करू शकतो. दरम्यान, त्रिपुरात ईद पूर्वीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचा वातावरण निर्माण झालं आहे.
संदर्भ : लोकमत