हिंदूंच्या मतांवर निवडून आलेल्या केंद्रातील सरकारच्या अखत्यारित असणार्या एअर इंडियाच्या संग्रहालयात हिंदूंच्या देवतांची अश्लील चित्रे रेखाटणारे म.फि. हुसेन यांची चित्रे कशी काय ठेवण्यात येतात ? काँग्रेसच्या काळात हुसेन यांची पाठराखण करण्यात आली, त्याचीच ‘री’ आताचे सरकारही ओढणार आहे का ? हिंदूंनी याचा वैध मार्गाने विरोध केला पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : मरीन ड्राईव्ह येथील एअर इंडियाच्या इमारतीचे सौंदर्य वाढवण्यासाठी एअर इंडिया ९ सहस्र चौरस फुटाच्या संग्रहालयात जगभरातील ३०० कलाकारांची चित्रे प्रदर्शित करणार आहे, ज्यामध्ये म.फि. हुसेन आणि सल्वाडोर दाली यांच्या काही चित्रांचाही समावेश आहे. या संग्रहालयात एअर इंडियाने ६ दशकांपासून गोळा केलेल्या कलाकृतींचे संकलन करण्याचे ठरवले आहे. प्रस्तावित संग्रहालयाचे गेल्या स्वातंत्र्यदिनी उद्घाटन करण्याचे ठरवले होते; पण निधी उपलब्ध नसल्यामुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. या संग्रहालयावर ५ कोटी रुपये व्यय करण्यात आले आहेत.
बी. प्रभा, व्ही.एस्. गायतोंडे, ए. आलमेलकर, रत्नदीप आडीवरेकर आणि अंजॉली इला मेनन यांच्या चित्रांचाही या प्रदर्शनात समावेश आहे. काही कलाकारांना त्यांच्या कामाच्या बदल्यात विमानाची विनामूल्य तिकिटे मिळाली आहेत.
संग्रहालयात १० व्या शतकातील मूर्ती, धातूकाम आदी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. तसेच, धार्मिक मान्यता आणि विश्वास यांच्याशी संबंधित विविध विषय देखील असणार आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात